लोकमान्य कट्टा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, व्यापारी संघटना पदाधिकारी यांनी वाहिली श्रद्धांजली
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.
.jpg)


Post a Comment
0 Comments