ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संतोष डावखर आणि सहकारी 2014 पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत. दर वर्षी अंदाजे 25 हजारहुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. पुन्हा एकदा विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन तसेच ऐतिहासिक मुद्रांक कागदपत्रे, नाणी आणि चलन प्रदर्शन29 व 30 जानेवारी रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. आयोजकांनी शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वर्षी 50 हुन जास्त शाळा सहभागी झाल्या असल्याची माहिती संतोष डावखर यांनी दिली.
गेली अनेक वर्षे संतोष डावखर आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक शाळातील विद्यार्थी सहभागी होतात. तेच हे प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गर्दी करतात. यंदा याठिकाणी एआय तंत्रज्ञान, सोलर असे अनेक प्रयोग आले असून एआयमुळे विद्यार्थ्यांना माहिती गोळा करणे सोपे झाले आहे. यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचत असतात, नवीन शोध लावत असतात. हे शोध मांडण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होत असून यातूनच नासा अथवा इस्रो मध्ये कल्याण डोंबिवलीतील शास्त्रज्ञ नक्की जातील असा विश्वास संतोष डावखर यांनी व्यक्त केला.
.jpg)







Post a Comment
0 Comments