Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ

 

अखेर अंबरनाथच्या सत्तेत शिवसेनेचाही वाटा.. 

चूरशीच्या लढतीत श्रीकांत शिंदे यांचा भाजपाला धक्का

नाट्यमय घडामोडींनंतर अखेर अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिंदेंच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत.

                ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर 

गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर भाजपचे विजय मिळवला होता. मात्र सर्वाधिक जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. शिवसेनेने २७, भाजपने १४, कॉंग्रेसने १२, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ४ तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष पदी विराजमान होऊनही भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ अंबरनाथमध्ये पाहायला मिळाली. अखेर यात शिंदे आणि भाजपच्या युद्धात शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ पालिकेत सत्ता राखली आहे.भाजपने राष्ट्रवादी कॉग्रेस सह कॉंग्रेससोबत आपली आघाडी जाहीर केली. त्यानंतर राज्यात एकच गदारोळ झाला. भाजपवर देशभरातून टीका झाली. त्यानंतर कॉंग्रेसने घाईगडबडीत या १२ नगरसेवकांना निलंबीत केले. हीच संधी साधत भाजपने या १२ नगरसेवकांनी पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर शहरात अंबरनाथ शहर विकास आघाडी उदयास आली.

एकीकडे शिवसेनेला टाळून अंबरनाथ परिषदेत सत्तेत बसण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी भाजप एकही संध सोडत नव्हती. मात्र निवडणुकीच्या तीन दिवसांआधी गाफील भाजपला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धक्का दिला. भाजपच्या आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चार नगरसेवकांना शिवसेनेने गळाला लावले. त्यांचा स्वतंत्र असा शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन करत त्यांची नोंदही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

सोमवारी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे उपनगराध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. यात सुरूवातीला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप आणि भाजपवासी झालेल्या कॉंग्रेस नगरसेवकांनी सदाशिव पाटील यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहातही शहर विकास आघाडीचा गट स्थापनेचे पत्र वैध की शिवसेना महायुती आघाडीचे वैध यावरून राडा पाहायला मिळाला.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं. नगराध्यक्ष निवडून आला तरी मात्र सत्तेची सूत्रे शिंदे गटाच्या हाती असणार आहे.

अंबरनाथ नगरपालिकेवर आज पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिले होते. यामुळे ५९ नगरसेवकांपैकी २७ नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून दिले होते. आणि एक अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. यामुळे लोकांच्या मनात ही शिवसेनाच होती हे या निकालावरून स्पष्ट झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने अंबरनाथ नगरपालिकेत बहुमताच्या आधारावर सत्ता स्थापन केली आहे. तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेना महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक श्री.सदाशिव पाटील यांचा विजय झाला आहे. 

आज नगरपालिकेतील उपनगराध्यक्षांच्या दालनात त्यांची भेट घेत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अंबरनाथ शहराच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात येतील असा विश्वास आहे. यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक, अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments