Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा एआयद्वारे बनवलेला बनावट व्हिडिओ व्हायरल


उमेदवार संकेश भोईर यांनी दाखल केली

पोलिसात तक्रार

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. कल्याण येथील पॅनेल क्रमांक ६ ड मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संकेश भोईर. यांचा एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेला बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये संकेश भोईर. यांच्यावर हत्येचा गुन्हाखंडणीसारखे गंभीर आरोप दाखवण्यात आले असून हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांनी हा डाव आखल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

       दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर भोईर यांनी आक्षेप घेतला आहे. सदरचा व्हिडीओ बनावट असून सदरचे आरोप खोटे असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. आपल्या विरोधात पोलिसात एकही तक्रार दाखल नसतानाही आपली प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांनी डाव आखल्याचा आरोप करत याबाबतचे पुरावे त्यांनी मध्यमासमोर सादर करत याप्रकरणी भोईर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. 


Post a Comment

0 Comments