ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपॉवरच्या 'एमपॉवर युथोपिया' या युवा मानसिक आरोग्य महोत्सवाला जागतिक विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाले आहे. कल्याणमधील बीके बिर्ला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठ्या मूड परेडचे आयोजन केल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड असोसिएशनकडून (ओडब्ल्यूआरए) ही मान्यता मिळाली आहे.
या महाविद्यालयाच्या बिर्लोत्सव या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या मूड परेडमध्ये ८ ते २० वर्षे वयोगटातील ९०० हून अधिक विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांनी एकत्रितपणे १२ विशिष्ट भावना व्यक्त केल्या. भावनिक अभिव्यक्तीला सामान्य स्वरूप देणे आणि तरुणांमध्ये मानसिक आरोग्याभोवती मुक्त संवादाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या दोन दिवसांच्या महोत्सवात मुंबई आणि शेजारच्या भागांतील ५० हून अधिक महाविद्यालयांचे ७,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी तरुणांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या जागरूक आधारित अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या एका प्रत्यक्ष सर्वेक्षणातून असे दिसून आले की ५५ टक्के विद्यार्थी मित्रांकडून भावनिक आधार घेतात, २५ टक्के कुटुंबाकडून, तर १५ टक्के अजिबात आधार घेत नाहीत. केवळ ५ टक्के विद्यार्थी मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षकांशी संपर्क साधतात, यातून औपचारिक मानसिक आरोग्य सेवांशी मर्यादित सहभाग दिसून येतो. यामध्ये शैक्षणिक दबाव ही सर्वात मोठी समस्या (३० टक्के) म्हणून पुढे आली, त्यानंतर नातेसंबंधांचे प्रश्न (२५ टक्के), करिअरची काळजी (२० टक्के), चिंता किंवा अतिविचार (२० टक्के) आणि शारीरिक प्रतिमा आणि सामाजिक छळ (५ टक्के) समोर आल्या.
या उपक्रमाबद्दल भाष्य करताना, एमपॉवर आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, "तरुण जेथे कुठे असतील- कॉलेज कॅम्पसमध्ये असो किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात असो- तेथे मानसिक आरोग्याचे साहाय्य पोहोचले पाहिजे- एमपॉवर युथोपिया सारख्या उपक्रमांमध्ये जागरूकता, प्रवेश आणि समवयस्कांचा सहभाग एकत्र होतो. त्यातून विद्यार्थी निर्भयतेने आधार मिळविण्यास आणि कल्याणाच्या संस्कृतीत सक्रियपणे योगदान देण्यास सक्षम होतात. ही भारताच्या भविष्यातील भावनिक लवचिकतेमध्ये गुंतवणूक आहे."
भारतातील ७ टक्क्यांपेक्षा अधिक किशोरवयीन मुले मानसिक आरोग्याच्या आव्हानांना तोंड देत असताना, एमपॉवर देशभरातील सु्श्रुषेचा अभाव भरून काढण्यासाठी कॅम्पस-आधारित उपक्रमांना बळकटी देत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments