Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी निवडणुकीत बिनविरोध निवडीबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा


नोटा मतदान घेण्याची केली मागणी
बिनविरोध विजयी उमेदवारांना ठरणार नोटा मतदान डोकेदुखी 

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 केडीएमसी निवडणुकीत महायुतीचे २० उमेदवार पक्षाच्या वतीने बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहेत मात्र नोटा पर्याय नाकारल्याबद्दल समाजसेवकांनी महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.  समाजसेवक श्रीनिवास घाणेकर, यासंदर्भात हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मतदान आणि मतमोजणी आधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या २० उमेदवारां विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत नेत्यांनी घोषित केले. त्याचप्रमाणे बिनविरोध निवडून आल्याचं सांगत उमेदवारांनी देखील आपल्या मतदारसंघात विजय रॅली काढत जल्लोष साजरा केला. मात्र या विजयानंतर प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे, कारण नोटा पर्यायही ईव्हीएम मशीनवर उमेदवार म्हणून उपलब्ध आहे. मात्र पहिल्यांदाच पॅनल पद्धतीमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन एका उमेदवारासाठी लावायची की नाही यासंदर्भात प्रशासन संभ्रमामध्ये आहे. तर प्रशासनाच्या या संभ्रमामुळे आता समाजसेवक श्रीनिवास घाणेकर, आक्रमक झाले असून राज्य निवडणूक आयुक्त, संबंधित निवडणूक अधिकारी आणि केडीएमसी आयुक्त विरोधात न्यायालयात जाणार असल्याची तयारी सुरू केली आहे.


Post a Comment

0 Comments