राज्य निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एकीकडे विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने शिवसेना आणि भाजप महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने, तसेच ऍड. संजय मिश्रा, ऍड. चिराग व्यास, ऍड सोनल भगत, ऍड. वीणा त्रिपाठी आणि जागरूक नागरिक राजेंद्र मुकादम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. ज्या प्रभागांमध्ये केवळ एकच उमेदवार शिल्लक आहे, त्या सर्व प्रभागांमध्ये NOTA (None of the Above) या पर्यायाला काल्पनिक उमेदवाराचा दर्जा देऊन निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. तसेच त्या एकमेव उमेदवाराला जर NOTA पेक्षा कमी मते मिळाली तर संबंधित प्रभागात फेरनिवडणूक घेण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती आपचे निवडणूक समिती सल्लागार अॅड. आकाश वेदक यांनी दिली.
तसेच प्रबळ विरोधी राजकीय पक्षांच्या काही प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेना - भाजप युतीच्या 20 उमेदवारांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रभागांमध्ये NOTA च्या माध्यमातून निवडणूक झाल्यास, त्या उमेदवारांबाबत जनतेचे मत नेमके काय आहे, हे स्पष्टपणे समोर येईल असे मत आम आदमी पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी व्यक्त केले. याबाबत आपने राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
तर निवडणुक लढविण्याकरिता इच्छुकांनी निवडणुक लढण्यासाठी फॉर्म भरले असुन ठरलेली शासकीय फी भरुन स्वतःची उमेद्वारी जाहिर केलेली आहे. संविधानाप्रमाणे नागरीकांना मत मांडण्याचे व देण्याचा अधिकार असुन त्या अधिकारापासुन त्यांना वंचित ठेवणे हे कायदयाचे व संविधानाचे उल्लंघन आहे. तसेच अश्या परिस्थीतीमध्ये ज्या वॉर्डात एकच उमेद्वार असल्यास तिथे मतदारांना NOTA या विकल्पाला काल्पनिक उमेद्वाराचे दर्जा देऊन मतदान ठेवावे व नागरीकांना आपल्या मतदानाचे संविधानिक अधिकार बजावण्यासाठी संधी दयावी.
यातून संविधानाचे उल्लंघन होऊ देऊ नये तसेच नागरीकांना मत देण्यापासुन वंचित ठेऊ नये म्हणुन अंमलबजावणी व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा ऍड. संजय मिश्रा, ऍड. चिराग व्यास, ऍड सोनल भगत, ऍड. वीणा त्रिपाठी यांनी दिला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments