दिग्दर्शक दिनकर जाधव यांच्या हस्ते सुरेखा गावंडे यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
कोहिनूर फिल्म फेस्टिवल मुंबई 2025 हा सोहळा रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी डोंबिवली येथील देविशा हॉल येथे अतिशय सुंदर रीतीने,आटोपशीर आणि शिस्तबद्द पद्धतीने पार पडला.
या फिल्म फेस्टिवल मध्ये स्पर्धेसाठी जवळपास 200 च्या वरती शॉर्ट फिल्म आल्या होत्या. त्या फिल्म मधून जूरीनी 80 फिल्म सिलेक्ट करून त्यांना अवॉर्ड घोषित केले.या कार्यक्रमाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अनेक कलाकार, दिग्दर्शक उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर दिनकर जाधव (Director) Kohinoor film festival.स्वप्नील वाकनकर (actor)chief guest विनायक सपकाळे (Actor)chief guestसुहास पाध्ये (ज्युरी मेंबर)गणेश गुंजाळ(Co. Director उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा इंगळे यांनी केले.सुरेखा गावंडे यांचा मराठी गाण्याचा अल्बम तसेच त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित आहेत.सुगमभारती 2018 च्या पाठय पुस्तकात त्यांची कविता अभ्यासक्रमात होती.सुरेखा गावंडे यांना या अगोदर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्र तसेच देशाच्या राजधानीतही या कवयित्रीचा आणि तिच्या कवितांचा सन्मान झाला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments