Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड कल्याण येथे विज्ञान प्रदर्शन

 अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करून प्रकल्प तयार करण्याचा आनंद मिळतो व वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होण्यास मदत मिळते.त्याच सोबत  मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्याची पाळेमुळे रुजवली जातात, आणि शाळेमध्ये बाल वैज्ञानिक तयार होण्यास मदत होते.

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात  आले होते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांना चालना मिळणारे प्रयोग,प्रकल्प,कृती, नवी संकल्पना सादर करण्यासाठी कल्पकता हवी यासाठी अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांघिक रित्या प्रकल्पाची मांडणी केली. अन्न व आरोग्य,वायु प्रदूषण, वाहतूक व दळणवळण, मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे या विषयावर प्रकल्प मांडणी मुलांनी केली. अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाचे उद्घाटन व परीक्षण धाकटे शहाडचे केंद्रप्रमुख श्री रतिलाल चव्हाण व सौ शीतल कोळी मॅडम यांनी केले . शाळास्तरावर एकूण 70 प्रकल्पाची मांडणी करण्यात आली.





छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी चार प्रकल्पाची निवड करण्यात आली.संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे सर यांच्या कल्पक कल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला जातो. यामुळे मुलांना प्रत्यक्ष कृती करून प्रकल्प तयार करण्याचा आनंद मिळतो व वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होण्यास मदत मिळते अशा उपक्रमामुळे बाल वैज्ञानिक शाळेमध्ये तयार होण्यास मदत होते.

Post a Comment

0 Comments