. ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
विदर्भ माळी संस्था नवी मुंबई आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन वधू वर मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्सव तसेच हळदीकुंकू समारंभ आज दिनांक 4 /1/ 2026 रोजी दयानंद स्कूल पाच रस्ता मुलुंड मुंबई येथे मोठ्या संख्येने समाजबांधव व माता भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मा. रामराव निमकंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्याध्यक्ष पूनम धीरज तायडे मॅडम मोठ्या उत्सवात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत सावता महाराज मंडळ ऐरोली अध्यक्ष श्री सूर्यकांत थोरात तसेच पदाधिकारी. विदर्भ माळी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाशजी ढोकणे, माजी अध्यक्ष नामदेवराव बगाडे, माजी उपाध्यक्ष देविदास रहाटे, संस्थेचे सल्लागार एडवोकेट प्रभाकर राऊत बाविस्कर मॅडम.
वक्ते म्हणून:- कुमारी मोनिका काळे यांचे आणि जेष्ठ चित्रकार व प्रेरक व्याख्याते आनंदकिशोर कृष्णराव मेहर (रिअल इस्टेट व्यावसायिक) यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन उपस्थित समाजबांधवांना मिळाले.
कार्यक्रमांमध्ये समाजभूषण पुरस्कार मा. एडवोकेट संजय माळी साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन व प्रसिद्ध पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. विदर्भ माळी संस्थेचे कार्यक्रमाचे विशेष श्रम घेतलेले सहकारी उपाध्यक्ष संतोष भड, अविनाश गवळी, अरुण सातव इतर पदाधिकारी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अश्विनी राहटे सौ. अन्नपूर्णा इंगळे तसेच शैलेश वासनकर यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. आजचा कौटुंबिक स्नेहसंमेलन व वधू वर मेळावा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
सर्व समाज बांधवांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्यामुळे "मुंबई विदर्भ माळी संस्थेच्या वतीने संस्थेंचे अध्यक्ष मा.श्री.प्रभाकरराव सातव यांनी सर्वांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले. पुढें ही अश्याच प्रकारे सर्वांनी सहकार्य करत रहावे असे आवाहन केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments