ब्लॅक अँड व्हाईट (अंबरनाथ) प्रफुल केदारे
शहरातील पूर्वे कडिल स्वामी समर्थ चौक ते मोहनज्योत सोसायटीच्या रस्त्याच्या दुरस्ते साठी नागरिकांनी पल्लवी लकडे यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या. प्रचारा दरम्यान पल्लवी लकडे यांनी नागरिकांना शब्द दिला होता. की, मी निवडून आल्यानंतर तातडीने या रस्त्याचं काम सुरू होईल. या अनुषंगाने नुकतेच भूमिपूजन पार पडले. नगरसेविका पल्लवी लकडे यांचा पाठपुरावा आणि माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या पुढाकारातुन या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आलीय. तसेच पावसाळ्यात रस्त्याच्या शेजारी वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
मोहनज्योत सोसायटी रस्त्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या मागणीची दखल घेत नगरसेविका पल्लवी लकडे व माजी नगरसेवक संदीप लकडे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून डांबरीकरण सुरू करण्यात आले. याप्रसंगी मोहनज्योत सोसायटीतील रहिवासी व महिलांनी नगरसेविका पल्लवी व संदीप लकडे यांचे आभार मानले आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments