Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुंब्र्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा माघी गणपत्ती निमित्त बक्षिस वितरण समारंभ आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न

                      ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

 समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचलित ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा (मराठी माध्यम) आणि ज्ञानदीप कॉन्हेंट स्कूल मुंब्रा (इंग्रजी माध्यम) या शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला पालकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्या स्पर्धांना अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून  महिला पालकांचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शाळेचे अध्यक्ष मा.श्री.सतिश देसाई सर व सेक्रटरी मा.श्री.समीर देसाई सर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शाळेच्या उपाध्यक्षा मा.सौ. शिवानी देसाई मॅडम, खजिनदार मा. सौ. प्रविणा देसाई मॅडम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन ढाके. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री हेमंत नेहते. इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा गुजर आदी मान्यवर उपस्थित होत्या. 

महिला क्रीडा स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. १) पुठ्ठा पदन्यास या स्पर्धेत प्रथम क्रमांक  सौ. सीमा सचिन सिंग, द्वितीय क्रमांक सौ रुकसाना नदाफ २) फुगा फुगवून फोडणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्ना नितीन निगम, द्वितीय क्रमांक फरीन फातिमा ३) टिकल्या चिकटवणे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक सौ. रेखा लहू होरकटे , द्वितीय क्रमांक सुनिता धिरेंद्र पाल, यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्राथमिक विभागाच्या सहशिक्षिका सौ. सरिता सोनवणे मॅडम यांना  ठाणे महानगरपालिकेचा ठाणे यांना या वर्षाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने  पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमात शाळेच्या विदयार्थ्यांनी महिला पालकांच्या स्वागतार्थ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. उपस्थित सर्व पालकांना हळदीकुंकू व तिळगूळ, वाण देऊन स्नेहभाव वृद्धींगत केला. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments