. ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बदलापुरात स्कूल व्हँनमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करून आरोपीला शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण कोर्टाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 27 जानेवारी पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कल्याण सत्र न्यायालयातील न्यायाधीश पत्रावळे यांच्या दालनात सुनावणी दरम्यान नराधमाला ३ दिवसाची कोठडी देण्यात आली. बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं.
त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करत आरोपी व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी कोर्टाने त्याला २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता आणखीन काही खुलासे या घटनेत होण्याची शक्यता आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments