Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भारतीय जनता पक्षाच्यावतीने दावडी गावात शासकीय योजनांचे शिबीर

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवलीतील दावडी गावातील समाजसेवक आणि माजी नगरसेवक आणि सध्याचे कल्याण कृषी बाजार समितीचे उपसभापती असलेले श्री.जालिंदर जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण नेतृत्व श्री.दीपेश जालिंदर पाटील यांच्या वतीने गावातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचे शिबीर आयोजित केले होते. 


नागरिकांच्या आधार कार्ड, विषयी अडचणी सोडविण्यासाठी आधार कार्ड शिबीर घेण्यात आले.हजारो नागरिकांनी आपल्या आधार कार्ड संबंधित सर्व गोष्टींचे निराकरण करवून घेतले.त्याच सोबत नागरिकांना भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना म्हणजेच ज्या कुटुंबाबत मुलगी आहे अशा सर्व कुटुंबांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कसा देता येईल,त्या साठी संपूर्ण मार्गदर्शन करून त्या योजनेत पात्र ठरलेल्या नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


या सोबत आणखी महत्वाची बाब म्हणजे केवळ 555 रुपयांत 10 लाखांचा अपघाती विमा दिला गेला.अशा महत्वाच्या योजनांचे शिबीर आयोजित करून आपल्या परिसरातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी जालिंदर पाटील आणि त्यांचे सुपुत्र दीपेश पाटील हे सदैव झटत असतात.आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.

Post a Comment

0 Comments