ब्लॅक अँड व्हाईट कल्याण (विद्या कुलकर्णी)
रेल चाईल्ड संस्था संचालित सरस्वती मंदिर माध्यमिक विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आत्मसात करता यावीत त्याचप्रमाणे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने सरस्वती मंदिर माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा आयोजित केला होता.
सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरस्वती मंदिर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती. छाया पाटील मॅडम यांनी प्रस्ताविक सादर केले.
रेल चाईल्ड संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री. विवेकजी द्याहाडराय सर यांच्या शुभहस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले. रेल चाईल्ड संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उल्हासजी झोपे , संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. श्रीधरजी पटवर्धन , सरस्वती मंदिर माध्यमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. विनायकजी पहाडे , सरस्वती मंदिर प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. मुकुंदजी मुजुमदार , महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक , डोंबिवली शाळेचे शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. प्रवीणजी गवळी , रेल चाईल्ड संस्था सदस्य मा. श्री. मांडे सर , सरस्वती मंदिर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ .भडांगे मॅडम आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. सुरेश बोरसे सर , स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळ नगर डोंबिवली शाळेच्या माजी मुख्याध्यापिका तसेच साप्ताहिक डोंबिवली टाईम्स व साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईट च्या पत्रकार सौ. विद्या कुलकर्णी मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
अत्यंत स्वादिष्ट , रुचकर व पौष्टिक अशा खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच बुद्धीवर्धक व कौशल्यपूर्ण अशा खेळांची मांडणी विद्यार्थ्यांकडून केली गेली होती.
या आनंद मेळाव्यातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व खेळांचा आनंद लुटण्यासाठी शाळेचे सर्व आजी-माजी विद्यार्थी , पालक वर्ग व परिसरातील सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या थोर व्यक्तींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सरस्वती मंदिर माध्यमिक विभागातील कलाशिक्षक श्री. प्रकाश काकड सरांच्या अथक परिश्रमातून या आनंद मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच आकर्षक असा देखावा तसेच सेल्फी पॉइंट तयार केला गेला होता. त्याचप्रमाणे मोटू , पतलू व पांडा यांनी आनंद मेळाव्यातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
या आनंद मेळाव्यात असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ व खेळांच्या स्टॉलचे परीक्षण करून उत्तम अशा खाद्यपदार्थ व खेळांची निवड केली गेली व त्यात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सेवाजेष्ठ शिक्षक व परीक्षकांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. महानवर सर यांनी केले.
.jpg)









Post a Comment
0 Comments