Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जीवन दीप महाविद्यालयात महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशन


                    ब्लॅक अँड व्हाईट शहापूर वार्ताहर

      जीवनदीप शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथे महिला विकास मंचाच्या वतीने  दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा समुपदेशन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 

     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर डॉ. मोहिनी भिसे मॅडम यांनी आहार, व्यायाम, तणाव व्यवस्थापन व मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व प्रश्नोत्तर सत्रातून शंकांचे निरसन झाले. कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढली.  या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.   

जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोडविंदे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य कैलास कळकटे सरांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विकास मंचाच्या सर्व सदस्यांनी मनःपूर्वक प्रयत्न केले.

 सदर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SYBsc IT ची विद्यार्थिनी कु. माया मोंडुला हिने  केले,  तसेच प्रास्ताविक प्रा.रजनी परदेशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिपाली भोईर मॅडम यांनी केले.महिला विकास मंचाच्या सर्व सदस्यांनी  कार्यक्रमाचे  नियोजन केले.


Post a Comment

0 Comments