ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज वीर जिजामाता रोड येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जनार्दन परशुराम म्हात्रे (मा.स्थायी समिती सभापती) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री.रमेश म्हात्रे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पावशे,आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.जनार्दन म्हात्रे यांच्या पॅनल मध्ये त्यांच्या पत्नी सौ.रेखा जनार्दन म्हात्रे,त्यांच्या सोबत सौ.रविना राहुल म्हात्रे यांची उमेदवारी असून मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला.
सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी पॅनल 21च्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देत.शिवसेनेच्या माध्यमातून आजवर केलेल्या कामांची उजळणी करून उपस्थित नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.शिवसेनेच्या माध्यमातून आजवर मा.मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि दूरदृष्टी असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या अनेक विकास प्रकल्पांची माहिती सांगून येणाऱ्या काळात शिवसेनेला आणखी बळकट करण्याचे आवाहनही केले.
माजी.जेष्ठ नगरसेवक श्री रमेश म्हात्रे यांनी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देत शिवसेनेच्या माध्यमातून गल्लीबोळात विकासकामांना गती प्राप्त झाली त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले.यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी भावना व्यक्त केली.
तरुण उमेदवार म्हणून म्हात्रे कुटुंबातील पेशाने डॉक्टर असलेल्या सौ.रविना राहुल म्हात्रे यांनी आपल्या कुटुंबाच्या राजकीय वारशाचा दाखला देत आपणही सामान्य कुटुंबातील असल्याने सर्व सामान्यांच्या जीवनातील प्रश्न चांगल्या रीतीने समजतात त्यामुळे त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वात समाजकार्य करीत असून येत्या काळात आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.एकंदरीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेची घोडदौड सुरू झाली आहे.
.jpg)







Post a Comment
0 Comments