Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपातर्फे प्रभाग 21 मध्ये आधारकार्ड व आभा कार्ड शिबीर

भाजपातर्फे आयोजित मोफत आधार व आयुष्मान भारत कार्ड शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

                  ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपाचे कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार श्री प्रदीप जोशी यांच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सोयी नुसार सकाळी आणि संध्याकाळी मोफत आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन याचे आयोजन करण्यात आले.

आपल्या परिसरातील नोकरदार वर्ग असलेल्या नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार या शिबिरामध्ये नवीन आधार नोंदणी, तसेच आधारची अद्ययावत माहिती दुरुस्ती, तसेच आयुष्मान भारत कार्ड काढण्याच्या सुविधा मोफत देण्यात आल्या. अनेक गरजू नागरिकांनी या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

या उपक्रमातून सर्वसामान्य नागरीकांना शासकीय योजना सहज उपलब्ध होतील, हा उद्देश असून पुढील काळातही अशा सामाजिक उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.


यावेळी समाजसेवक उद्योगपती प्रदीप महादू जोशी, भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रिया जोशी, अल्पसंख्याक अध्यक्ष अख्तर चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ता असेल अध्यक्ष दत्ता कदम, कार्यकारी सदस्य विशाल पारखे, कार्यकारी सदस्य विनोद सोनावणे, पश्चिम मंडळ कोषाध्यक्ष गजानन ब्रम्हे, सरचिटणीस जयप्रकाश सावंत ,  पॅनल युवा अध्यक्ष हितेश जोशी, पवन मोरे, मंजू लता गुप्ता ,सविता गावडे, मेधा बर्वे, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.तसेच नागरिकानी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांनी प्रदीप जोशी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आमच्या सोयीनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांचे कार्य असेच चालू राहावे.

Post a Comment

0 Comments