ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
शिवसेनेचे युवा नेतृत्व श्री संदेश हरिश्चंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 49,50,51,52 या देवीचा पाडा,उमेश नगर,महाराष्ट्र नगर, गरीबाचा वाडा, कुंभारखाण पाडा,आणि राजुनगर परिसरातील हजारो नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
श्री.संदेश हरिश्चंद्र पाटील व त्यांची सुविद्य पत्नी डॉ.रसिका संदेश पाटील यांच्या माध्यमातून नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.त्याच अनुषंगाने वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळत सामाजिक भान ठेऊन लोकोपयोगी कार्य करण्याच्या दृष्टीने ही शिबीर आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “समाजासाठी काहीतरी देणे हाच खरा वाढदिवसाचा आनंद” अशी भावना यावेळी संदेश पाटील यांनी व्यक्त केली.समाजसेवक संदेश पाटील आणि समाजसेविका रसिका संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक उपक्रम यापुढेही सुरूच राहतील अशी ग्वाही दिली.
या समाजभिमुख उपक्रमामुळे परिसरात कौतुकाचा सूर उमटत असून नागरिकांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
.jpg)



Post a Comment
0 Comments