ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
निळजे येथील लोढा हेवन संकुलात शिवसेने तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही परसरातील नागरिकांच्या सोयी साठी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याची जनरल तपासणी, नेत्र तपासणी,स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांकडून स्त्रीरोगाविषयी तपासणी,हाडांचे विकार,मधुमेह ,कॅन्सर, ECG,तसेच बालरोग या सर्व समस्या साठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तपासण्या करण्यात आल्या.गरजू रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली.
तसेच नेत्ररोग संबंधी मोतीबिंदू तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ह्या परिसरातील हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन ह्या शिबिराचा लाभ घेतला.
हे शिबीर शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख सौ.दीपाली सतीश पाटील , श्री.सतीश पाटील,श्री.सुभाष पाटील आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नाने सफल झाले.
.jpg)









Post a Comment
0 Comments