मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात व्यक्त केला तीव्र निषेध
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसच्या वतीने आज कल्याण शहरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ व निष्क्रिय कारभाराविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध तातडीच्या समस्या शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता, दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, अपुरी आरोग्य सुविधा, सततचा वाहतूक कोंडीचा त्रास तसेच शहर विकासातील उदासीनता यावर युवक काँग्रेसने प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
मोर्चाचे नेतृत्व कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग माटा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले तर कल्याण पश्चिम युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या प्रसंगी कल्याण डोंबिवली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे, रीना खांडेकर, हरमीत सिंग, फैझ खान, विमलेश विश्वकर्मा, श्रेयस सिंग आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक काँग्रेसने या आंदोलनातून स्वच्छ पाणयाचा अभाव, घाणीचे साम्राज्य, वाहतूक समस्या, वाढते प्रदुषण, आरोग्य सेवांची कमतरता आदी नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या प्रशासनाचा निषेध नोंदवून तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली.
.jpg)




Post a Comment
0 Comments