ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली पश्चिम भिडे गल्लीतील कॉम्प्लेक्स मधील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या धार्मिक भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे परंपरेला कायम ठेवत, यावर्षी देखील माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक आणि युवा नेत्या पूजा धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. ६० आणि ६१ प्रिसिंक्टमधील सुमारे दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण संकुलात धार्मिक वातावरण आणि भक्तीभाव पसरला होता.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भजन स्पर्धा, ज्याने संपूर्ण परिसर भक्तीमय उत्साहाने भरून टाकला. ही स्पर्धा दोन प्रसिद्ध भजन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
गजानन प्रासादिक भजन मंडळ, डोंबिवली (पूर्व) यांच्या वतीने बुवा विलास गुरव व भजनसम्राट प्रमोद हरयाण यांचे शिष्य बुवा प्रमोद विलास गुरव विरुद्ध गावदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवलीच्या वतीने भजनसम्राट बुवा भगवान लोकरे यांचे शिष्य बुवा संजय पवार दोन्ही गटांच्या भक्तीगीत, अभंग आणि गायनाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर भक्ती आणि आध्यात्मिक उर्जेने दुमदुमून गेला.
स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष शैलेश धात्रक आणि संपूर्ण आयोजन समितीचे आभार मानले आणि सांगितले की अशा धार्मिक परंपरा समाजात एकता, शांती आणि सौहार्द वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
.jpg)





Post a Comment
0 Comments