Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ....कल्याण केंद्रातून दगडी भिंत प्रथम

             ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी)

६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ ही सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या होत्या .या प्राथमिक फेऱ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये पुणे, मुंबई आणि इतर केंद्रांवर सुरू होत्या.त्याची पारितोषिके जाहीर झालेली असून महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, कल्याण केंद्रातून 





श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवलीचे दगडी भिंत या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झालेले आहे.तसेच अन्य पारितोषिके पुढील प्रमाणे

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम : आशुतोष वाघमारे 

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : प्रथम विनोद राठोड 

सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम : वृषांक कवठेकर 

सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रथम : मानसी साळवी 

सर्वोत्कृष्ट रंगभूषा प्रथम : उल्लेश खंदारे 

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन प्रथम : आशुतोष वाघमारे 

अभिनय रौप्यपदक : श्रुती गणपुले

ही स्पर्धा ११नोव्हेंबर२०२५ते४डिसेंबर या कालावधीत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण  येथे अतिशय जल्लौशात झाल्या.येथे एकूण १८नाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते.वरील सर्व पारितोषिक प्राप्त कलाकारांचे सर्वत्रअभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments