वैशाली म्हात्रे, किरण म्हात्रे यांच्यासह शेकडो डोंबिवलीकरांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
"दोघातील मैत्री कपटी,"
शिंदेच्या शिवसेनेला व भाजपला टोला
भाजप आणि शिंदे गटात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांची टीका
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भाजप आणि शिंदे गटात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी टीका करत शिवसेना भाजपा या दोघातील मैत्री कपटी असल्याचा टोला लगावला आहे. डोंबिवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण म्हात्रे, विकास पोटे, वैशाली म्हात्रे, स्वप्निल भोईर, अनिरुद्ध भोईर, विक्रम भोईर, शिवानी नाकती, प्रणाली गुरव, तुकाराम तेजस, बापू तेजस आणि प्रांजल तेजस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. कल्याण जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिवबंधन सोहळ्याला पश्चिम शाखेत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि परिसर ‘भगवा झेंडा फडकणारच’ अशा जल्लोषपूर्ण घोषणांनी दणाणून गेला.
या प्रवेश सोहळ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्ष प्रवेशवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख तात्या माने, उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, शहर संघटिका प्रियांका विचारे, उपशहर संघटिका निशा रेडीज, लक्ष्मी कांबळी, विभाग संघटिका रेश्मा सावंत, शाखा संघटिका अर्चना पाटील, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहर प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र सावंत, उपशहर प्रमुख श्याम चौगुले यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी भाषणात सांगितले की, सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून स्पर्धा सुरू असली, तरी आमच्या पक्षात सुशिक्षित, डॉक्टर, आयएएसची तयारी करणारे तरुण, उच्चशिक्षित नागरिक स्वतःहून येत आहेत. डोंबिवली सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आमच्या नेतृत्वावरचा विश्वास वाढत आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रयत्न झाले, तरीही नागरिक आमच्या कार्यावर आणि कर्तुत्वावर विश्वास ठेवूनच पक्षात प्रवेश करत आहेत. जोपर्यंत कल्याण-डोंबिवली महापालिकेवर निष्ठावंत शिवसेनेचा भगवा फडकत नाही, तोपर्यंत एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.
.jpg)


Post a Comment
0 Comments