शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांची घोषणा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभात इयत्ता पहिलीत शिकणा-या एका लहान चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन सर्वानाच आश्चर्यचकित केले. या मुलाची प्रतिभा बघून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांनी या मुलाचा दहावी पर्यंतचा शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलण्याची जवाबदारी घेतली. भोईर यांच्या घोषणेनंतर सर्वांनी भोईर यांचे कौतूक केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेतर्फे कल्याणच्या पॅनल क्रमांक नऊमध्ये आयोजित तीन दिवसीय हळदी कुंकू समारंभात महिलांनी भरपूर आनंद लुटला. विजेत्या महिलांना पैठणी, पोहे हार, दागिने आणि लकी विजेता महिलांना सोन्याची नथ देण्यात आल्या. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा सह संघटक रूपेश भोईर आणि महिला उप शहर संघटक रूपाली भोईर होत्या. मनसे तर्फे उर्मिला तांबे आणि कपिल पवार सह आयोजक होते.
या कार्यक्रमात कल्याण पश्चिमेत टिळकनगर येथे राहणारा आणि इयत्ता पहिलीत शिकणा-या भाग्येश जगदाळे यांने छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाऊन सर्वानाच मंत्रमुग्ध केले. लहान वयात पोवाडा गाणा-या भाग्येशचे शिक्षण कुठे थांबला नाही पाहिजे याचा विचार करून रूपेश भोईर यांनी उपस्थित शेकडो लोकांसमोर भाग्येशचा दहावी पर्यंतचा शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलण्याची जवाबदारी स्वीकारण्याची ग्वाही दिली.
.jpg)



Post a Comment
0 Comments