ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयासह राज्य शासनाचे विरोधात विविध संघटनांनी दि.05 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय शाळा बंद आंदोलनाची हाक दिली होती.
याच वेळी शिक्षण संचालक यांनी शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचे त्या एका दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश काढला होता. या वेतन कपातीची झळ शिक्षकांना लागू नये याची काळजी घेऊन व त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेतील विविध मागण्यांसाठी व शिक्षकांमध्ये असलेला असंतोष प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस व कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव, सचीव ज्ञानेश्वर गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या शाळा बंद ऐवजी शाळेत काळ्या फिती लावून आंदोलन करावे या आवाहनाला साथ देऊन दि.05 डिसेंबर 2025 रोजी ठाणे जिल्हातील अनेक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळ्य फिती लावून आंदोलन केले.
.jpg)





Post a Comment
0 Comments