सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत कल्याणकरांना वाहतूक कोंडीतच करावे लागणार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शहाड उड्डाण पूलाची दुरुस्ती त्यानंतर कल्याण पूर्वेतील धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलाच्या दुरुस्ती पाठोपाठ आता कल्याण उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या कल्याण पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या पुलाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पूल १५ डिसेंबर पासून वीस दिवस बंद ठेवण्यात येणार असून या पुलाचे काम पूर्ण होण्यास नवीन वर्ष उजाडणार असल्याने सरत्या वर्षातही कल्याण डोंबिवली करांना वाहतूक कोंडीचे भूत मानगुटीवर बसणार आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात कल्याण नगर जोडणारा महत्वाच्या राष्ट्रीय मार्गा वरील शहाड पुलाच्या दुरुस्ती काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाथी घेत सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
तब्बल वीस दिवस दुरुस्तीच्या कामासाठी शहाड उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. उड्डाण पुलाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शहाड पुलाच्या दुरुस्तीचे काम होताच पालिकेने कल्याण पूर्व विठ्ठलवाडी शहराला जोडणारा एफ केबिन वालधुनी धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या बांधकाम विभाग कडून करण्यात आले होते. या पुलाचे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कल्याण मुरबाड रस्त्या वरील नेताजी सुभाष चंद्र बोस उड्डाण पुलावरील जागोजागी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी या उड्डाण पुलाची पाहणी करून या पुलावरील दुरुस्तीचे निर्देश दिले होता. पालिका प्रशासनाने धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर आता आर.ओ.बी -४१, नेताजी सुभाष चंद्र बोस उड्डाण पुलाच्या दुरुस्ती साठी काम हाथी घेतले आहे. या पुलाच्या बेरिंग रिपेरिंगचे काम झाले असून उड्डाण पुलाच्या रस्त्याचे जूने डांबर काढण्याचे काम.सुरू करण्यासाठी रस्त्या खोदण्यात आला असून मास्टिंग अल्फास्टिंक चे काम सुरू करण्यात आले आहे. या उड्डाण पुलाच्या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करण्यासाठी येत्या १५ डिसेंबर २०२५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत वीस दिवस उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उड्डाण पूल वरील वाहतूक बंद ठेवण्यासाठी वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाकडून सूचना अद्यापही काढण्यात आली नसली तरी येत्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांकडून वाहतूक वळविण्याचे सूचना काढली जाण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुल,नेताजी सुभाष चंद्र बोस उड्डाण पूल तसेच कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील प्रल्हाद शिंदे उड्डाण पूल या तीन उड्डाण पुलाच्या दुरुस्ती च्या कामासाठी ६ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या निधीची तरतूद केली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments