ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
माननीय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महसूल निधीच्या माध्यमातून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.जगन्नाथ शिंदे यांच्या मागणीनुसार कल्याण पश्चिम भागातील खडक पाडा परिसरातील पदपथाची दुरुस्ती,तसेच बेतुरकरपाडा परिसरातील रहिवाशी भागातील पायवाटा,आणि गटारीच्या विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पातळीवरील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.ह्या भूमिपूजनाच्या प्रसंगी महायुती म्हणून भाजपा शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित राहिले होते.त्यामुळे शहरातील विकासकामांसाठी कोणताही भेदभाव न करता महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमस्थळी श्री उमेश बोरगावकर, श्री.उदय गणपत जाधव,श्री.रामचंद्र नरहरी वाबलकर,श्री.दर्शन सुनील देशमुख,श्री अमित खोत,सौ.छाया इंगळे आणि अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
.jpg)









Post a Comment
0 Comments