ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 30 मध्ये शिवसेनेच्या वतीने परिसरातील महिलांच्या सन्मानासाठी व मनोरंजनासाठी ‘आमच्या लाडक्या बहिणीसाठी – खेळ पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १३ डिसेंबर रोजी नानासाहेब धर्माधिकारी हॉल, गावदेवी मंदिर, नांदिवली गाव, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हजारो महिलांनी उपस्थिती लावली.आणि खेळ पैठणीचा यात हिरीरीने भाग घेतला.
उपस्थित सर्व महिलांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक विवेक पोरजे यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीने सादर केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अर्जुनभाई पाटील, प्रकाश गोविंद म्हात्रे, अनिल सिताराम म्हात्रे, नितीन नारायण माळी, दिलखुश दामू माळी, अॅड. ब्रम्हा दिनेश माळी व उमेश बाबू पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. महिलांसाठी खास पारंपरिक खेळांचे आयोजन करून संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात महिलांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली. एकूण २१ पैठणींसह फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मिक्सर, गॅस शेगडी, ओव्हन, घरघंटी, कुकर, डिनर सेट यांसारखी अनेक आकर्षक पारितोषिके बक्षीस म्हणून देण्यात आली. विजेत्या महिलांना पैठणी व इतर बक्षिसांनी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला एकनाथ मामा पाटील, प्रेमा प्रकाश म्हात्रे, संगीता अनिल म्हात्रे, पद्माकर देसले, ओम लोके, सुनील मालकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
.jpg)









Post a Comment
0 Comments