Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपच्या वतीने डोंबिवलीत भक्ती, संस्कृतीचा सोहळा

                      ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवलीतील प्रभाग ३० मध्ये भाजपाच्या वतीने ग्रामदैवत असलेल्या आई गावदेवी मातेचा अभिषेक सोहळा आणि श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.त्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमही करण्यात आला.



कल्याण ग्रामीण मंडळ ३ अंतर्गत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ३० च्या वतीने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच आई गावदेवी मातेचा अभिषेक सोहळा भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. विधिवत पूजा अभिषेक, मंत्रोच्चार, आणि आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तीरसाने न्हाऊन निघाला. या सोहळ्यास विविध संत, महाराज तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.




या प्रसंगी पांडुरंग सुकीर म्हात्रे, विकास वामन देसले, रवीना अमर माळी, सचिन गंगाराम म्हात्रे, गोपीचंद पाटील, प्रसाद गोपीनाथ माळी, अमर माळी, जेष्ठ नेते अर्जुन बुवा चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापूजेनंतर महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या “जम्बो लकी ड्रॉ” ने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या लकी ड्रॉ मध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने,मुलांसाठी सायकलसह अनेक मौल्यवान व आकर्षक बक्षिसांचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमाला महिलांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी धार्मिकतेसोबत सामाजिक उपक्रमाचा आनंद घेतला.

नागरिकांसाठी असे उपक्रम राबविणे म्हणजे सामाजिक एकोपा दृढ करणे, तसेच भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण, भक्तिमय   वातावरणात पार  पडला.

Post a Comment

0 Comments