ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरूच आहे.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.ठाणे जिल्हाध्यक्ष आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,श्री. भरत गजानन गोंधळे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश पार पडला.
शिवसेना पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण येथील भरत गजानन गोंधळे यांची शिवसेना जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवणे, शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे, तसेच मतदारांशी संपर्क साधून पक्षाचे कार्य वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे शिवसेना संघटनेला नवचैतन्य मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरत गजानन गोंधळे यांनी पक्षाने दिलेल्या या जबाबदारीबद्दल वरिष्ठांचे आभार मानून संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments