ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे माजी आमदार मा.नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पॅनल क्रमांक सातच्या वतीने दिनांक १२ रोजी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरासाठी माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक संदीप गायकर, समाजसेविका हेमलता नरेंद्र पवार, श्री. शामल मंगेश गायकर आणि भारती गायकर यांनी विशेष परिश्रम घेत शिबीर यशस्वी केले.या सोबत प्रभागातील परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले, ज्यामध्ये नागरिक व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणीचा लाभ घेतला आणि पात्र नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
.jpg)








Post a Comment
0 Comments