Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीतील संदप गावात शिवसेनेच्या वतीने महाआरोग्य शिबीर

                   ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 30 मध्ये शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सौजन्याने संदप गावातील श्री दत्त मंदिर,प्रांगणात भव्य  महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.डोंबिवली ग्रामीण भागातील आणि संदप गावाच्या परिसरातील नागरिकांच्या सोयी साठी हे आरोग्य शिबीर  घेण्यात आले.





शिबिराचे आयोजन शिवसेनेचे पदाधिकारी तसेच समाजसेवक अर्जुन पाटील, अनिल म्हात्रे, नितीन माळी, दिलखुश माळी, ब्रह्मा माळी,विनोद पाटील, प्रकाश म्हात्रे, पद्माकर देसले, उमेश पाटील,शशिकांत पाटील, महिला आघाडीच्या सौ.संगीता अनिल म्हात्रे, सौ.प्रेमा प्रकाश म्हात्रे,सौ.प्रतिमा पाटील, सौ.भावना पाटील, तसेच समस्त पदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते.

या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया,एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी,हाडांच्या विकारांची तपासणी,सर्दी, खोकला, ताप, जनरल तपासणी,ईसीजी तपासणी,स्त्रीरोग तज्ज्ञ सल्ला,बालरोग तपासणी,मधुमेह तपासणी..अशा अनेक शारीरिक व्याधीसाठी तपासणी आणि मार्गदर्शन तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधे असे सर्व काही एकाच ठिकाणी  तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी  समाधान व्यक्त केले.या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकानी गर्दी केली होती.








Post a Comment

0 Comments