Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विरोधकांना चारिमुंडया चित करण्याचा निर्धार करा - एकनाथ शिंदे

 

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवून विरोधकांना चारिमुंडया चित करण्याचा निर्धार करा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, महिला आघाडीच्या ज्योती वाघमारे, उपनेत्या विजया पोटे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे,  जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड, शहर प्रमुख निलेश शिंदे, रवी पाटील, माजी महापौर रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


 यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलतांना सांगितले की, काही जण बोलत होते शिवसेना ठाण्यापुरती आहे, मात्र शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पसरली आहे हे लोकसभा विधानसभा नगराध्यक्ष निवडणूकित दाखवून दिले.
कल्याण पूर्वेत विकासाची गंगा आली याचा आनंद आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजण्याचं काम करायचं आहे. कल्याण पूर्वेचा विकासाचा फैसला करण्याची तारीख 15 जानेवारी आहे. 

मुख्यमंत्री असतांना अडीच तास देखील झोपलो नाही. आपण झोपायला नाही तर झोपा उडवायला आलोय. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती लोकं देतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून लोकांची कामं करणे हा आमचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी असून विकास हाच आमचा अजेंडा आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा बँड वाजवायचा आहे. ज्यांनी कार्यकर्त्याना वाऱ्यावर सोडलं त्यांना लोकांनी वाऱ्यावर सोडलं. 

शिवसेना घराघरात पोहोचवायची असून ही कार्यकर्त्यांची निवडणूक नेत्यांनी लढायची आहे. खुर्चीसाठी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा. टिंगल करणारे अडकले सिंगल अकड्यावर. आरोपांना आणि टिकेला कामातून उत्तर देतो. लोकसभा, विधानसभा, नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट मोठा आहे. देशात, राज्यात आणि आता महापालिकेत देखील महायुती पाहिजे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments