मुंबईतील नामांकित कलाकारांच्या कलाकृतींना रसिकांची दाद
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
महाराष्ट्र आर्टिस्ट वंदन सोसायटीतर्फे आयोजित ‘विंग्स ऑफ होप’ या विशेष कला प्रदर्शनाला कला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. संतोष पेडणेकर व सौ. दिप्ती कोटक यांच्या उपस्थितीत झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कलाकारांना प्रेरणा मिळाली.या प्रदर्शनात मुंबईतील नामांकित कलाकारांनी सहभाग नोंदवला असून सकारात्मकता आणि मानवी भावविश्वाचे विविध पैलू त्यांच्या कलाकृतींमधून प्रभावीपणे साकारले आहेत. प्रत्येक कलाकृतीत मेहनत, शिस्त आणि सर्जनशीलतेची निष्ठा स्पष्टपणे जाणवते.
या प्रदर्शनाचे संचालन मुख्य समन्वयक म्हणून (Curator) प्रा.श्री.अरविंद सावंत करत असून, प्रदर्शनात आशा मालुसरे कद्रेकर, विजय जाधव, जय सालियन,चांदणी रावसा आणि अरविंद सावंत यांच्या कलाकृतींना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शनाची तारीख : २३ते रविवार, २८ डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७
स्थळ : नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट गॅलरी, ग्राउंड फ्लोअर, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, नेहरू प्लॅनेटेरियम परिसर, वर्ली, मुंबई
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. अर्विंद सावंत 📞 99690 11611 / 93245 11611
कला क्षेत्राला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. ‘विंग्स ऑफ होप’ हे प्रदर्शन कलारसिकांसाठी प्रेरणादायी आणि भावस्पर्शी अनुभव ठरत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments