ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
स्वामी विवेकानंद हायस्कूल नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी एनसीसीच्या माध्यमातून एकता, शिस्त ,देशसेवा, नेतृत्व गुण रुजवण्या साठी तसेच देशासाठी आदर्श नागरिक ,सेवाभावी कार्यकर्ते व भविष्यातील सैनिक घडवण्याच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची घेऊन असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज व्हि. बी.एम.मॉडेल हाय स्कूल मुंबई येथील एक महाराष्ट्र बटालियनचे फर्स्ट ऑफिसर श्री विशाल पाटील यांना ब्रिगेडियर शिरीष ढोबळे व कॅप्टन मनोज भामरे सर तसेच प्राचार्य सुमन सिंह , असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद जगताप सर , उपाध्यक्ष विदुला साठे यांच्या हस्ते बेस्ट एनसीसी ऑफिसर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.या पूर्वी ही त्यांना सन 2015 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी कामठी नागपूर येथे मेजर जनरल यांच्या हस्ते कमांडेड पुरस्कार देण्यात आला होता.हा सन्मान व्हि.बी.एम.मॉडेल हायस्कूल शाळेचा तसेच सर्व आजी-माजी एनसीसी कॅडेट यांचा सन्मान आहे. या सन्मानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी सरांचे अभिनंदन केलेले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments