Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी क्षेत्रातील मांडा-टिटवाळा विभागातील नागरिक विविध नागरी समस्यांनी त्रस्त

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम विधानसभा "अ" प्रभागातील मांडा-टिटवाळा विभागात गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना मूलभूत नागरी सोयीसुविधांच्या अभावामुळे अत्यंत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्यादुर्लक्षलेली पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या अपुऱ्या लक्षामुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विभागातील बहुसंख्य रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून अनेक ठिकाणी खड्ड्यांनी भरलेले आहेत. वाहतूक कोंडीअपघातआणि धुळीमुळे होणारे आजार हे नागरिकांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाले आहेत. तसेच गटारे तुटलेली व अपूर्ण असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहतेज्यामुळे डेंग्यूमलेरियात्वचारोग यांसारखे आजार फैलावत आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. काळू नदीवरील विद्यमान बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला असून पाण्याचा साठा टिकत नाही. या ठिकाणी नवीन बंधाऱ्याचे बांधकाम व नदीपात्राचे सुशोभीकरण केल्यास विभागातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल आणि परिसराचे सौंदर्यही वाढेल.

     विभागातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधीडासआणि रोगराईचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्याजवळ मोकाट कुत्र्यांचे मोठे थवे निर्माण झाले आहेत. अलीकडेच टिटवाळ्यातील रिजेन्सी सर्वम परिसरात एका वयोवृद्ध महिलेवर कुत्र्यांच्या हल्ल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणावे आणि नियमित कचरा संकलनाची प्रभावी व्यवस्था करावी.

  टिटवाळा स्टेशन परिसरात अधिकृत पार्किंगची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या बाजूला वाहन उभी करावी लागतात. फेरीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलाखालील मोकळ्या जागेत पार्किंग व भाजी मार्केटची व्यवस्था केल्यास वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि शिस्तबद्धता निर्माण होईल.

     कल्याण ते टिटवाळा गणेश मंदिरपर्यंत कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाची बससेवा सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. रेल्वेवरील गर्दी कमी होईल आणि स्त्री-पुरुष नोकरीधारक व शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवास सोयीस्कर बनेल त्याचबरोबर महापालिकेचे उत्पन्न वाढेल. विभागातील अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या अत्यंत खाली लटकलेल्या असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे तातडीने भूमिगत विद्युत जाळे  टाकण्याची आवश्यकता आहे.

    मांडा टिटवाळा जवळपास दीड लाख लोकसंख्या असूनही या विभागात अद्ययावत सरकारी रुग्णालय नाही. किरकोळ आजारांपासून ते गंभीर उपचारांसाठी नागरिकांना कल्याण किंवा डोंबिवलीकडे जावे लागते. स्थानिक पातळीवर आधुनिक आरोग्य केंद्र उभारल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. विभागात मुलांसाठी खेळाचे मैदान नसल्याने मुले रस्त्यावर किंवा गल्लीबोळात खेळण्यास भाग पडतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. तसेच जेष्ठ नागरिकांसाठीही एक व्यवस्थित उद्यान व व्यायामासाठी जागा निर्माण करण्याची गरज आहे.

     प्रतिक्रिया

1)       किशोर शुक्ला (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभा संघटक कल्याण पश्चिम) ) :

 नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांनाही निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मांडा-टिटवाळा विभागातील सर्व तातडीच्या नागरी समस्यांवर त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे कार्य हाती घ्यावेजेणेकरून मांडा टिटवाळा महापालिकेच्या स्मार्ट सिटी मधील विकसित शहर म्हणून नवा रुपात येईल.

2)       गणेश भाटे (अध्यक्ष संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगर) : टिटवाळा येथील इंदिरानगर स्मशानभुमी रस्ता विभागात शौचालय नाहीतपिण्याच्या पाण्यासाठी मोठी 25 दशलक्ष लिटर पाणी टाकी नाही. रस्त्यावरील प्रचंड धुळ त्यामुळे श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होत असुन आजारपण सुरूच आहे.  रस्त्याची दुरवस्था असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार लाईन नाहीपिण्याचे पाणी नाहीस्पीड ब्रेकर नाहीतगति दर्शविणारे फलक नाहीगतिरोधक नाहीतगार्डन नाहीशासकीय रुग्णालय आणि रुग्णवाहिका नाहीसीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बऱ्याच चाळीतील पायवाट ठिकाणी पथदिवे नाहीत अशा असंख्य समस्याचा पाठपुरावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडे केला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments