ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
शुभांगी पासेबंद यांचे 'फुलास जिथे फुलता येते' हे रोहिणी प्रकाशन ने प्रकाशित केलेले पुस्तक घरचीच भेट म्हणून माझ्या हातात आले.त्यांचे आणि माझं पुस्तक एकत्र प्रकाशित करायचे ठरलं होतं. पण शुभांगी मॅडमच रोहिणी प्रकाशनच्या तत्परतेमुळे आधी झालं .ऐरोली येथील चौगुले स्पोर्ट्स सेंटरमध्ये ,विजय चौगुले सरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं .शुभांगी ताईंचे हे पन्नासावे पुस्तक आहे.
खूप मोठ्या कार्यक्रमांमध्ये ,गाजावाजा करून ,सहसा तरी त्या पुस्तक प्रकाशित करत नाही .पण हे पुस्तक पन्नासावे असल्यामुळे त्यांनी चौगुले सरांच्या सारख्या, मान्यवर व्यक्तीच्या हस्ते कवी संमेलनाच्या ,रोहिणी प्रकाशनच्या वर्धापनाच्या मोठ्या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला आनंदाने संमती दिली .
मनोगतात लेखिका म्हणतात की :
'सृजन कधीच सोपं असतं बीजाला अंकुरित होण्यासाठी ,स्वतःला मातीत गाडून घ्यावे लागत. कुठेही, देणगी देऊन बक्षीस घ्यायचं नाही, हे माझं ध्येय मी ठरवलं. मला बक्षिसांनी भरलेल कपाट दाखवायचं अथवा प्रदर्शन करायचं नाही. मला मनाचा समाधान हवं आहे. मला काही सांगायचं आहे आणि ते मी व्यक्त होते आहे.'
प्रस्तावनेसाठी साधारण मोठा माणूस शोधावा लागतो .त्या व्यक्तीने लिहिलेली ती प्रस्तावना देण्यात हेतू असा असतो की," मी या अमक्या ग्रेट माणसाने हे पुस्तक सर्वप्रथम वाचले आहे ." घाईत या पुस्तकाला कोणाची प्रस्तावना घेतलेली नाही.
आशय तर भारी आहे.तेज गणेशाचे या पहिल्या स्तंभाने सुरू झालेला हा स्तंभ संग्रहाचा ललित लेखांचा प्रवास उत्कंठावर्धक आहे. सुखाचे फुगे, पुस्तक ऐकलं पुस्तक वाचलं, आईची किंमत किती? इगतपुरीचा धम्मगिरी, पॅरिस स्पर्श, साडीची महती ,पुस्तक परीक्षण असे वेगळे स्तंभ आहेतच. त्यासोबत अगदी साधेसुधे म्हणजे भात महिमा, ज्वारीची भाकरी चिवडा असे तोंडाला पाणी सुटणारे स्तंभ देखील याच्यात आहे. फॉलिन लव ते ब्रेकप ते मेकअप असा एक तरुणांना ब्रेकअप मधून कसा सावराव हे सांगणारा स्तंभ देखील आहे . (त्या विषयावर त्यांची 23 ललित लेख पाठोपाठ एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते.)
अधिक पुढे गेल्यावर परी कथेतील परी ,टेढा है पर मेरा है ,या सुखांनो या ,अगदी गुंतागुंत गुंतागुंत, आखिर क्यों पासून, ते आराम करा आणि नवीन सुरुवात करा ,असा या स्तंभांचा प्रवास आहे .
या संग्रहातील प्रत्येक लेख स्वतंत्र असूनही सर्व लेख एकत्रितपणे जीवनाच्या विविध रंगांची उकल करतात .आतापर्यंत वेगवेगळ्या वर्तमानपत्रात शुभांगी मॅडमचे पाचशेहून अधिक स्तंभ प्रकाशित झाले आहे .त्यांच्या या पन्नासाव्या पुस्तकाच्या निमित्ताने मला असं वाटलं की त्यांची प्रगती अशीच चालू राहिली तर लवकरच त्यांची शंभर पुस्तक देखील होतील. त्यांच्या ह्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!
शीर्षक फुलास जिथे फुलता येते प्रकाशक रोहिणी प्रकाशन नवी मुंबई ऐरोली
मुखपृष्ठ रंगीत, पृष्ठ 433 .स्तंभ 122
प्रकाशन दिनांक 5 ऑक्टोबर 2025
आय एस बी एन 9781 989 147 05
.jpg)

Post a Comment
0 Comments