हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वेषभूषा स्पर्धा,खेळूया खेळ पैठणीचे, आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉ
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, आणि समाजहिताचे हे कार्य सातत्याने सुरु आहे. याच परंपरेतून मार्गशीर्ष महिन्यानिमित्त मेळावा 2025 हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नवीन आशा महिला फाऊंडेशन व माजी उपमहापौर मोरे श्वर भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्गशीर्ष मेळावा 2025’ कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात मेळाव्याची रंगत अधिकच खुलली.
या कार्यक्रमात महिलांसाठी खेळ–रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वेषभूषा स्पर्धा, तसेच MEGA Lucky Draw यांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक बक्षिसे आणि सांस्कृतिकतेची ओढ या दोन्हींनी महिलांचा उत्साह दुणावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पोरजी यांनी उत्तमरीत्या केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, शिस्त आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.
मेळाव्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजारोच्या संख्येने माता-भगिनींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. आलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक पारितोषिक देण्यात आले.
मोरेश्वर भोईर माजी नगरसेवक, गणेश भाने, माजी नगरसेवक रमाकांत पाटील, सचिन गायकर,भरत जाधव, महेश भोईर,रणजीत उगाडे ,नीलम भोईर, प्रगती भोईर, सोनी शिरसागर, अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या आलेल्या प्रत्येकाला जेवणाची सोय करण्यात आली
.jpg)









Post a Comment
0 Comments