पालिकेच्या ३१ प्रभागातून मतदार याद्या बाबत ८४०० हरकती
तर तब्बल ८२ हजार ५५८ दुबार नावे प्रारूप मतदार यादीत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी वर हरकती घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदत वाढ दिल्या नंतर हरकती घेण्याच्या अंतिम मुदतीचा दिवसाअखेर पालिकेच्या ३१ पॅनल मधून ८४०० नागरिकांनी हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
मतदार यादीवर प्राप्त झालेल्या नागरिकांच्या हरकती वर सुनावणी घेतली जाणार नसून या हरकतीचे निवारण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिकेच्या निवडणूक विभागाला दिल्याने या हरकतीची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदारांची अंतिम यादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.तसेच या प्रारूप मतदार यादीत ८२ हजार ५५८ दुबार नावे असल्याने मतदार यादीचा निपटारा करतानापालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची यंदाची निवडणुका प्रथमच पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. १२२ सदस्य निवडी करीता चार सदस्यांचे २९ पॅनल व तीन सदस्यांचे २ पॅनल असे ३१ पॅनल आहेत. या ३१ पॅनल साठी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर झाल्या नंतर २० नोव्हेंबर रोजी महापालिकेतील मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेच्या ३१ पॅनल मध्ये एकूण १४ लाख २४ हजार ५४० मतदारांचा समावेश होता. या मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. ३ डिसेंबर पर्यंत मतदार यादीवर हरकती नोंदविण्यास मुदतवाढ दिली गेली. ३ डिसेंबरपर्यंत १२२ प्रभागातून ८ हजार ४०० जणांनी हरकती नोंदविल्या आहेत. पॅनल क्रमांक एकमधून ९३४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर पॅनल क्रमांक २० मधून १७ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त हरकतीमध्ये एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच प्रभागाच्या सिमे रेषेवरील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जाऊ शकतात. मात्र प्रभागाच्या मध्य भागातील मतदारांची नावे एकगठ्ठा दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील मतदारांची नावे कल्याण ग्रामीणमधील काटई गावात दाखविण्यात आली आहे. ज्या मतदारांचे नाव पत्ते काटई गावात दाखवले गेले आहेत. त्याठिकाणी त्या नाव पत्त्याच्या चाळीच अस्तित्वात नाहीत.
या प्राप्त हरकतीची छाननी ९ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मतदान केंद्रांची यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल तसेच मतदान केंद्रनिहाय यादी २२ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूकीसाठी आचार संहिता लागून निवडणुकीची तारीख घोषित केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तर दुसरीकडे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ८२ हजार ५५८ मतदारांची नावे दुबार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनसने दुबार मतदारांची नावे ३२ हजार असल्या संदर्भा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात आढळून आलेल्या दुबार मतदारांची नावे ही दुप्पट असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या २०१५ सालच्या निवडणुकीत एकूण १२ लाख ५० हजार ६४६ मतदार संख्या होती. तर यंदाच्या निवडणुकीत एकूण १४ लाख २४ हजार ५२० मतदार संख्या आहे. मागील निवडणुकी पेक्षा १० वर्षाच्या कालावधीत केवळ १ लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढल्याने त्यातच या प्रारूप मतदार यादीत ८२ हजार ५५८ मतदारांची नावे असल्याने ही मतदारांची नावे कमी केल्यावर १० वर्षात किती मतदार वाढले व किती मतदारांची नावे कमी झाली हे देखील औसुकत्याचे राहणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments