Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेवर आगरी कोळी समाजाचाच महापौर बसला पाहिजे अन्यथा दुसरा विचार करावा लागेल कोळी महासंघाचा राजकीय पक्षांना इशारा

राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्याहस्ते

ठाणे जिल्हा पदनियुक्ती सोहळा

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेतील समेळ मंगल कार्यालय येथे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. यामुळे कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांना कल्याण येथे एक नवी दिशा मिळाली. यावेळी महासंघासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. तर ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेवर आगरी कोळी समाजाचाच महापौर बसला पाहिजे अन्यथा दुसरा विचार करावा लागेल असा इशारा  कोळी महासंघाच्या वतीने राजकीय पक्षांना देण्यात आला.


या कार्यक्रमात कोळी महासंघ कार्याध्यक्ष प्रकाश बोबडीचिटणीस राजहंस टपकेसहसचिव सतीश धडेराज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटकरयुवा प्रदेशअध्यक्ष चेतन पाटिलतसेच सुभाष बाबडेकाशिनाथ बामगिनेसतीश देशेकरभावेश पाटीलसुभाष कोळीरवींद्र भंडारीहनुमान कोळीदशरथ पाटीलज्ञानेश्वर भोईरराजू कोटभीमसेन पाटील आदी मान्यवरांसह इतर अनेक पदाधिकारीकार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना महासंघाची ताकद अधिक बळकट करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्याबाबत आणि कोळी समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या महत्त्वाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना पुढील कामकाजासाठी योग्य दिशा देण्यात आली.  कोळी महासंघाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावशाली करण्यासाठी कार्ययोजनेवर अधिक लक्ष केंद्रित करणे,  महासंघाच्या ताकदीत वाढ करण्यासाठी नवीन युवा व महिला सदस्यांना जोडणेत्यांना सक्रिय  करणे आणि गावपातळीपर्यंत संघटनात्मक जाळे विणणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे महासंघ खऱ्या अर्थाने समाजाचा आधारस्तंभ बनेल असे रमेश पाटील यांनी सांगितले.     

कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी आगरी कोळी समाजात आता एकजूट झाली आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या असून  मुंबई ठाणे जिल्ह्यात आगरी कोळी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. जिल्ह्याच्या विकासात देखील आगरी कोळी समाजाचा मोलाचा वाटा आहे. मात्र आगरी कोळी समाजातील लोकप्रतिनिधींना महापौर पद दिले जात नाहीडावलले जाते अशी खंत व्यक्त केली. पुढे बोलताना आगरी कोळी समाजातील लोकप्रतिनिधीमधूनच महापौर नियुक्त करावा अन्यथा विचार करावा लागेल असा इशारा राजकीय पक्षांना दिला.


Post a Comment

0 Comments