ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय जनता पार्टी जुने कल्याण शहरअध्यक्ष अमित धाक्रस यांच्या भाजपा शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना शहर कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत करून भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी आवाहन केले.
या शहर कार्यालय उद्घघाटन प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, बेटी पढाव संयोजिका शुभा पाध्ये, प्रदेश प्रतिनिधी डॉक्टर तांबडे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, माजी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, भाजपा नवीन शहर अध्यक्ष स्वप्निल काठे, भाजपा मध्य शहर अध्यक्ष रितेश फडके, मांडा टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी नगरसेवक वरूण पाटील, अर्जुन भोईर, अनिल पंडित, सचिन खेमा, संतोष तरे, दया गायकवाड, माजी परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी तसेच सर्व माजी नगरसेवक व भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी युवा मोर्चा पदाधिकारी तसेच कार्यकर्ता उपस्थित होते.
भाजपा शहर कार्यालयाचे उद्घाटनाचे औचित्य साधून येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष मोरेश्वर तरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये चव्हाण यांच्याहस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला. तसेच भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते प्रशांत माळी यांची भाजपा जूने कल्याण शहर सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पक्षाकडून सर्वांचे आभार व्यक्त केले.
.jpg)

Post a Comment
0 Comments