कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवलीतील पूर्वेतील प्रभाग क्रमांक 115 मधील नदीवली वामनदेव मंदिर,आनंदी बंगला ते शुभम सोसायटी,देसले पाडा क्रॉस रॉड पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गटार कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आणि आमदार राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभागातील अनेक विकासकामांसाठी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
त्यासाठी श्री अनिल सीताराम म्हात्रे, माजी सरपंच आणि शिवसेना विभागप्रमुख आणि त्यांच्या पत्नी सौ.संगीता अनिल म्हात्रे,माजी ग्राम सदस्या,तथा तालुका उपसंघटक शिवसेना यांनी सततचा पाठपुरावा करून आपल्या विभागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्याच अनुषंगाने प्रभागातील सर्वात जुनी पाण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात सोडविली गेली.आधी ह्या परिसरासाठी दररोज पाण्याचे टँकर्स आणून पाणी पुरवठा केला जात होता.अनिल म्हात्रे यांनी आपला प्रभाग हा टँकर मुक्त करून नागरिकांना दिलासा दिला आहे.त्याच प्रमाणे प्रभागातील इतर समस्या जसे रस्त्याचे काँक्रीटीकरण,गटारव्यवस्था अशी कामे करण्यासाठी श्री.अनिल म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी रखडलेली विकासकामे सुरू करीत आहेत.
लवकरच प्रभागातील नागरिकांच्या समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनीही श्री अनिल म्हात्रे यांना त्यांच्या कामाबद्दल पाठिंबा दर्शविला आहे. प्रभागातील सदर भूमिपूजनासाठी शिवसेनेचे नेते आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. समाज सेवक आणि उद्योजकअर्जुन पाटील, प्रमिला म्हात्रे,विकास देसले,आकाश देसले, ओम लोके,रोशन पाटील,आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सर्व महिला भगिनींनी श्री अनिल म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी भक्कम पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या.
.jpg)





Post a Comment
0 Comments