ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांच्या तर्फे सन २०२४-२५ च्या आमदार निधीतून २ कोटी १ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.
या निधीतून कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रभाग. ९७ शनिनगर प्रभागातील हनुमान नगर ते न्यु संजय अपार्टमेंट येथे गटार बनविणे, शनिनगर प्रभागातील ओम मार्लेश्वर सोसायटी ते अनिता अपार्टमेंट पर्यंत आर सी सी गटार बनविणे, शनिनगर प्रभागातील हिरा अपार्टमेंट ते माँ संतोषी कोम्पलेक्स मागील रस्ता काँक्रिटीकरण करणे. शनिनगर प्रभागातील भागाबाई चाळ ते पांडुरंग नगर पर्यंत आर. सी. सी. गटर बनवून बंदिस्त करणे. शनिनगर प्रभागातील पुनम अपार्टमेंट ते बाळु पावशे चाळी पर्यंत आर.सी.सी. गटर बनविणे व बंदिस्त करणे. शनिनगर प्रभागातील हनुमान नगर मुख्य रस्ता ते नक्षत्र अपार्टमेंट पर्यंत रस्ता क्रॉक्रिटीकरण करणे.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रभाग. १०२. भगवान नगर प्रभागातील पावशे चाळ परिसरात पायवाट व आर.सी.सी. गटार बनविणे. प्रभाग. १०३, कैलासनगर - साईनगर मध्ये जनसेवा मित्र मंडळ परिसरात सी.सी. रस्ता तयार करणे, कैलासनगर साईनगर परिसरातील भारती चाळ ते दुर्गा कॉलनी पर्यंत (जनसेवा) रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे. साईनगर-कैलासनगर परिसरातील साईराज कॉलनी ते विनायक कॉलनी ब्रिज (कमलादेवी कॉलेज) पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. प्रभाग १०२. भगवान नगर मधील जय प्रभुकुंज सोसायटी हनुमाननगर परिसरात सी. सी. गटार व पायवाट बनविणे. अशी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामे हाती घेण्यात आली आहेत.
या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते पार पडला. ही कामे म्हणजे केवळ विकास नव्हे, तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि समाजसेवेचा ठोस पुरावा आहेत. जनतेच्या विश्वासाला उतराई होणं, हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली.
या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज राय, हेमलता पावशे, अमृता जाधव,अनंता पावशे, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, यशोदा माळी,चंद्रशेखर म्हात्रे,राकेश देशमुख,सौरभ सिंग, मोना शेठ, वंदना मोरे, सत्यप्रकाश उपाध्याय, राजेश अंकुश, संदीप जाधव, उल्हास खरात तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)





Post a Comment
0 Comments