उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य
उपस्थितीत पक्ष प्रवेश
खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची
ही उपस्थिती
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात आहेत. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युती धर्म असतांना देखील भारतीय जनता पार्टीने रविवारी शिवसेनेचे काही माजी नगरसेवक तथा पदाधिकारी यांना भाजपा मध्ये प्रवेश दिल्या नंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत भाजपाच्या या कृतीला शिवसेने तर्फे जशास तसे उत्तर देण्यात आले. शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी उपस्थित राहून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
तर भारतीय जनता पक्षावर आपली नाराजी नव्हती तर विकासकामांना निधी मिळत नसल्याने स्थानिक नेतृत्वावर आपण नाराज होतो अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तारे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
.jpg)







Post a Comment
0 Comments