ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शहरात अंमली पदार्थांच्या (नशील्या वस्तूंच्या) अवैध विक्रीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस उपायुक्त पोलीस (डीसीपी) अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तयार केलेल्या विशेष पथकाने शनिवारी महत्त्वपूर्ण कारवाई करत छापा टाकला आणि त्यात प्रचंड प्रमाणात अंमली (मादक) कोरॅक्स सिरपचा साठा हस्तगत केला. ही धडक कारवाई बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली.
उप आयुक्त परिमंडळ 3 यांचे विशेष कारवाई पथक सपोनी अनिल गायकवाड व त्यांचे पथक हे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थ विरोधी कारवाई कामी गस्तीवर असताना एपीएमसी मार्केटजवळ, फोर्टिस हॉस्पिटलच्या नजीक, एका व्यक्तीला मोटरसायकलवर संशयास्पद स्थितीत काही वस्तू घेऊन जाताना पाहिले. संशयावरून त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ कोरेक्स सिरपच्या ४०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळीच पाच पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई पूर्ण केली.
अटक केलेल्या व्यक्तीची नाव मोहम्मद मेहताब अनीस (वय ३३), जो गोल्डन प्लाझा, मौलाना शौकत अली चौक, कल्याण येथे राहणारा आहे. आरोपीला प्रतिबंधित सिरपसह ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याचे कलम ८(क) आणि २२(ख) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या मालाची एकूण अंदाजित किंमत सुमारे ₹४,६३,६६०/- इतकी आहे, ज्यात कोरेक्स सिरप: ४ लाख रुपये किमतीच्या ४०० बाटल्या. मोटरसायकल: ६०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल.
रोख रक्कम: ३,६६० रुपये यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, आरोपी यापूर्वीही महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्यात आरोपी होता. आरोपी हे प्रतिबंधित सिरप शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकत असे आणि त्याद्वारे अवैध नफा कमवत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments