Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ.सुश्रुत वैद्य वसंतस्मृती आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्काराने सन्मानीत

                           ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

रवि दि.९नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी, कोकण विभागातर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणगौरव सोहळा पार पडला. यामध्ये कल्याणातील नामांकित बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह दंत चिकित्सक डॉ.सुश्रुत भा.वैद्य

 यांना 'वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कारा'ने सन्मानीत करण्यात आले.हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांचे शुभहस्ते देण्यात आला. यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे लाडके व लोकप्रिय आमदार ॲड. निरंजन डावखरेसाहेब, आमदार श्री. संजयजी केळकर साहेब, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब , भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

    डॉ. सुश्रुत वैद्य हे बालक मंदिर संस्थेच्या कार्यकारणीवर ९ वर्षापासून पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत सध्या ते ६ वर्षापासून कार्यवाह म्हणून काम करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवाकाळात  आतापर्यंत अनेक कामे मार्गी लावण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून १२ लाख निधी मिळवून,त्यांनी कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलधील  प्रयोग शाळेचे अद्ययावत असे नूतनीकरण केले आहे. संस्थेच्या कल्याणातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी देखील त्यांचं अभूतपूर्व असं योगदान राहिलं आहे.तसेच संस्थेच्या चिंचले आश्रम शाळेच्या नवीन वस्तीगृहाचे बांधकाम सुरू करण्याच्या कामातही ते महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी शाळेत स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी जवळपास १३५ शैक्षणिक व सामाजिक दर्जेदार व नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत १००० दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी कल्याण शहरामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचेही  आयोजन केले होते. तसेच जिल्हास्तरीय बाल नाट्य महोत्सवाचेही आयोजन केले होते.त्यांना सामाजिक व शैक्षणिक कार्याची प्रचंड आवड आहे, ते आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून बालक मंदिर संस्थेसाठी व रोटरी क्लबसाठी आपलं कायम महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

 कॅन्सर रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत म्हणून Shaman Cancer Care हे अद्यावत कॅन्सर रुग्णालय त्यांनी चालू केले आहे.  शासकीय योजनेतून अनेक कॅन्सर रुग्ण  तेथे मोफत उपचार घेत आहेत.  डॉ. सुश्रुत वैद्य यांचे संस्था पातळीवर व सर्वत्र कौतुक  करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments