ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईट तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2025,जाहीर करण्यात आला होता.त्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेकडो प्रस्तावातून निवडक 40 प्रस्ताव निवड समितीकडून निवडण्यात आले.वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांत कार्यरत असेल शिक्षक बंधू भगिनींना या पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले.त्यानुसार दिनांक 9/11/25 राजी डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान फडके रोड येथील वक्रतुंड सभागृहात हा पुरस्कार सोहळा अतिशय खेळीमेळीने पार पडला. 

"डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले होते की"वाचाल तर वाचाल" या उक्ती प्रमाणे माणसाने वाचन संस्कृती पाळून आपल्या आचरणात वैचारिक बदल घडवून समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे.विद्यार्थीच नाही तर प्रत्येकाने वाचन संस्कृती समजून घेतली पाहिजे. पुस्तके वाचून आपण आपले ज्ञान वाढवू शकतो,आपल्या पुस्तकी ज्ञानात भर पडत असली तरी आपण माणसं वाचायला शिकले पाहिजे."त्यातून माणसे ओळखायला सोपी जातात.मानवी स्वभाव,आणि जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्याला कळतात".
"आपल्या शिक्षकांनी वाचन करायला शिकविले नसते तर आज आपण इथे संपादक म्हणून उभे राहू शकलो नसतो,"असे वक्तव्य संपादक विजय यादव यांनी केले. "मी जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे आहे,प्रत्येकाच्या जीवनाचे शिल्पकार हे शिक्षकच असतात.शिक्षक नसते तर आज समाजात सुशिक्षित जमात उभी राहिली नसती.जगाची प्रगती कोणत्याच प्रकारे प्रगती झाली नसती,म्हणूनच आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्व अनन्यसाधारण आहे." असेही त्यांनी म्हटले.
सदर कार्यक्रमाला उद्योजक आणि विश्वास फौंडेशनचे अध्यक्ष श्री विनय भोईटे,उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका,आणि समुपदेशक असलेल्या सौ सारिका भोईटे पवार ,आणि शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री.सुधीर घागस हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
सुधीर घागस यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या समस्या आणि शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. श्री विनय भोईटे यांनी समाजातील शिक्षक या व्यक्तिमत्वाविषयी आपले विचार प्रकट करतांना त्यांच्या विषयी आत्मीयता व्यक्त केली.सौ.सारिका भोईटे पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील आपल्या शिक्षकांच्या जिव्हाळ्याबद्दल आठवणींना उजाळा देत,त्यांच्या विषयी आदर व्यक्त करत,प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे महत्व किती मूल्यवान आहे विचार मांडले.
आजच्या कार्यक्रमात श्रोते म्हणून शिक्षक वर्ग बसले होते.त्यांना आपल्या ओघवत्या आणि दमदार आवाजात सूत्रसंचालन करीत खिळवून ठेवण्याचं काम प्रसिद्ध अभिनेता, व निवेदक श्री सतीश नायकोडी यांनी संपूर्ण कार्यक्रमात जीव ओतला.अतिशय सुरेख आणि देखण्या स्वरूपात असा हा पुरस्कार सोहळा आनंदात संपन्न झाला.
.jpg)
























Post a Comment
0 Comments