ब्लॅक अँड व्हाईट विशेष
वाढत्या वयाप्रमाणे, चिंता, असुरक्षितता, असहायपणा, एकटेपणा, नैराश्य वाढताना दिसतात.तारुण्यात सक्रियपणे, स्वतंत्रपणे सर्व सूत्र यशस्वीपणे पार पाडलेली असतात आणि हीच सूत्रं आपल्या कडून दूर होताना पाहणं अगदी असह्य होते .
वार्धक्याचं स्वागत क्वचितच कोणी केलं असेल.
आयुष्यभर केलेलं खडतर तप, कष्ट, तडजोड, तब्बेतीकडे केलेलं दुर्लक्ष वय वाढेल तसं डोकं वर काढायला लागतं.
वार्धक्य (म्हातारपण) हे काही फक्त वयावर ठरत नसतं. म्हणतात ना "जिंदगी जिंदादिली का नाम है"
म्हणूनच मनाला खुप निरोगी ठेवा, आनंदी ठेवा. मनाच्या स्वास्थ्याला दुर्लक्षित करू नका.
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे अधिकरण "
पण कसे ?
1. स्वतःचे व्यक्तिमत्व जाणुन घ्या.
2. आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे काही खुणगाठी बांधून घ्या.
3. आपल्या मनाचे इंधन कोणते ते ओळखा.
4. आपल्या मनाचे संभावित त्रास आणि इलाज जाणून ते ताबडतोब स्वीकारा.
5. तज्ञांचा सल्ला घ्या.
मानसोपचार तज्ञ : निमकर अपर्णा
Whats app no. 8879794924
.jpg)


Post a Comment
0 Comments