Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घरोघरी जगभरी श्री शिवरायांची आरती


                      ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

 घरोघरी जगभरी श्री शिवरायांची आरती व्हावी आणि नव्या पिढीला विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय आणि त्यांच्या शूर मावळ्यांचा गडकोट किल्ल्यांचा इतिहास जागृत राहण्यासाठी तसेच समाजातील माता भगिनी विद्यार्थिनी यांना अन्याय, अत्याचार छेडछाड विनयभंग करणारे नराधमां पासून संरक्षण व्हावे प्रतिकार करण्याची बळकटी मिळावी या उद्देशाने दर रविवारी रात्री 8 वाजता अखंडित छत्रपती शिवरायांची महाआरती छत्रपती शिवाजी महाराज नगर मानपाडा येथे होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 10/11/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मंदीर मराडेपाडा भिवंडी येथे जाऊन 193 वी महाआरती शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि विश्वस्त यांच्या परवानगीने मनोभावे घेण्यात आली. सदर आरतीस  श्री. कुलदीप पोखरकर,श्री सरोज ठाकरे,श्री दत्तात्रय म्हेत्रे,श्री कृष्णा पोळ,श्री वसंत लोखंडे,श्री वसंत लोखंडे,श्री विशाल पाटिल आणि इतर शिवभक्त उपस्थित होते.

 या महाआरतीच्या संकल्पनेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर तसेच शालेय सामग्री त्यांना खाऊ वाटप, वैद्यकीय सामग्री, कपडे या प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून सेवा दिली जात आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील युथीका फाउंडेशन आणि रोटरी क्लब ठाणे सौ विभावरी मनी मॅडम यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.

 येणाऱ्या काळात घरोघरी आणि चौका चौकात शिवरायांची आरती व्हावी, जेणेकरून माता भगिनींवर कोणी वाईट नजरेने बघता कामा नये. छेडछाड लगट आणि विनयभंग करणारे टुकार टपोरी यांना एक वचक या माध्यमातून बसेल अशी आशा आहे.

गेली 193 आठवडे दर रविवारी 8 वाजता होणाऱ्या घरोघरी जगभरी छत्रपती शिवरायांची महाआरती संकल्पनेचे चे ठिकाण/स्थळ शिवभक्त कुलदीप सोपान पोखरकर यांचे निवासस्थान 210 चित्रकुट निवास छत्रपती शिवाजी महाराज नगर चितळसर मानपाडा ठाणे पश्चिम

Post a Comment

0 Comments